सेनगांव तालुक्यातील कापडसिनगी मार्गावर नातेवाईक महिलेस दुचाकीवर गावाकडे नेत असताना एका व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सेनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत विदर्भातील एका गावातील महिला काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यातील तिच्या माहेरी आली होती त्यानंतर सदर महिलेस नेण्यासाठी तिचा नातेवाईक राजू धोतरे जिल्हा बुलढाणा हा दुचाकी घेऊन आला होता.