दुचाकीचा अपघात होत एक दुचाकी स्वार जखमी जाण्याची घटना वैजापूर रोडवरील वडगाव पाटी जवळ घडली. युनोज शेख वय 55 वर्षे राहणार मुद्देश वाडगाव तालुका गंगापूर असेघटनेतील जखमी व्यक्तीचे नाव आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार युनू शेख यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी त्यांना रुग्णवाहिकच्या मदतीने गंगापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दाखल केले.