गोरेगाव: पंचायत समिती गोरेगावच्या आवारात अंध-अपंग व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दिवाळी उपक्रम
स्थानिक पि.डी.रहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील भारत स्काऊट गाईड चमुने पंचायत समिती गोरेगाव येथील परिसरात अंध अपंग व गरजू विद्यार्थ्यांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरा होवो या हेतूने हस्तकलेद्वारे निर्मित विविध रांगोळी, सजावटीचे वस्तू इत्यादी तयार करून पंचायत समिती परिसरात विक्रीकरिता स्टाल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती गोरेगावचे उपसभापती सुभाष महारवाडे व खंड विकास अधिकारी एच.व्ही. गौतम यांच्या हस्ते करण्यात आले.