धारणी: तालुक्यात भीषण अपघात — ट्रॅक्टरच्या धडकेत कामगाराचा मृत्यू
धारणी तालुक्यातील हद्दीतील गावातील एका कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येथे १८ ऑक्टोबर रोजी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मृतक प्रदीप मौजीलाल जोंधेकर हा धारणी येथील हद्दीतील गावचा रहिवासी होता. तो कामानिमित्त जात असताना कुसुम कोट ते मांढवा रोडवर एमएच २७ बीबी २६०७ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने आणि एमएच २७बीबी ४०२४ या ट्रॉलीने त्याला जोरदार धडक दिली.या धडकेत प्रदीप गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चालकाने ट्रॅक्टर वेगाने व बेपर्वाईने चालवल्यामुळे