उरण: उरण मतदारसंघात काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला जाहीर पक्षप्रवेश
Uran, Raigad | Oct 22, 2025 उरण विधानसभा मतदारसंघात आज बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा ‘माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी पार पडला.गिरीश पांडुरंग मुकादम, सुरज मुकादम आणि किरण मुकादम यांनी भाजपचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला.