नागपूर ग्रामीण: 'घर संसार सेल'ला भीषण आग; लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
नागपूर शहरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे आणि आगीच्या घटना देखील समोर येत आहे सूतगिरणी जवळील काळेवाडी परिसरात गुरुवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास 'घर संसार सेल' या गृहपयोगी साहित्याच्या दुकानाला अचानक भीषण आग लागली.दुकानात प्लास्टिक व ज्वलनशील साहित्य असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दुकान जळून खाक झाले.