सेनगाव: ताकतोडा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाभावी संस्थेचा पुढाकार
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या ठिकाणी आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन वैरागड,सचिव संगीता वैरागड,ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र मानमोठे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.