जालना: जालना शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत 147 अतिक्रमणे निष्कासित; मंठा चौफुली परिसरात राबविली मोहिम
Jalna, Jalna | Jun 23, 2026 जालना शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने जालना महानगरपालिका प्रशासनामार्फत अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. मंगळवार दि. 23 जून 2026 रोजी सायं. 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार मंठा चौफुली परिसरात विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम उपायुक्त त्र्यंबक कांबळे तसेच सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.मोहिमेदरम्यान मंठा चौफुली ते न्हावा रोड त्या मार्गावरच्या अतिक्रमण काढले.