सेलू शहरातील मोंढा भागातील किराणा मालाचे गोदाम फोडून चोरट्याने तूरडाळ, तांदूळ असा विविध प्रकारचा 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 16 डिसेंबर सकाळी सात वाजता उघडकीस आली.याप्रकरणी सायंकाळी पाच वाजता अज्ञात चोरट्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.