जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाला दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाने शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.