अंजनगाव सुर्जी: मुऱ्हा देवी जत्रेत ९ वर्षीय बालिकेचा विनयभंग; आरोपीला पोलीसांनी केली अटक
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हा देवी येथे भरलेल्या नवरात्र जत्रेत एक धक्कादायक घटना उघडकीस आली. रविवारी दुपारी ३:०० ते ३:३० वाजताच्या सुमारास ९ वर्षीय बालिका तिच्या आई सोबत जत्रा फिरायला गेली आणि जत्रेतील जॅम्पिंग झुल्यात बसली,त्या बालिकेसोबत झुला चालविणाऱ्या सय्यद खलील सय्यद कलाम (वय ४८, रा. सुर्जी, अंजनगाव) या नराधमाने अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला.माहितीनुसार आरोपीने बालिकेला बाजूला नेवून लोडिंग ऑटोमध्ये बसवून चुंबन घेतले आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन करु लागला.