नगर: शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकारी नियुक्तीसाठी शहरात मुलाखती
नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा जनमानसात रुजवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोशल मीडिया विभाग कार्यान्वीत करण्यात आला आहे. या विभागाच्या अहिल्यानगर जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी शिवसेना सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सोशल मीडियात कार्य करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.