बंद झालेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्याच्या बदल्यात ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भंडारा येथील राज्य कर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार नशिम रहीम शहा (रा. पवनी) यांनी त्यांचे क्लाइंट प्रमोद सोनकुसरे यांचा ऑक्टोबर २०२४ पासून बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता; हा अर्ज तांत्रिक प्रक्रियेसाठी वस्तू व सेवा कर विभाग, भंडारा येथील राज्य कर अधिकारी मनीष मुरलीधर सहारे (वय