पाटोदा: सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू, हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी
Patoda, Beed | Sep 30, 2025 बीड जिल्ह्याला दसरा मेळाव्याची परंपरा आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला भगवानगडावरील दसरा मेळावा मंत्री pankaja munde या दसरा मेळाव्याचा वारसा चालवत असून बीडच्या पाटोदा तालुक्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीतील सावरगाव घाटमध्ये दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटा दसरा मेळावा होणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे.