सेनगाव: केंद्रा बुद्रुक येथे 16 एकर वरील सोयाबीनची गंजी जळून खाक,शेतकऱ्याचे मोठे नुकसान
सेनगांव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक या ठिकाणी 16 एकर वरील काढणी केलेल्या सोयाबीनच्या दोन गंजीला भीषण आग लागून शेतकऱ्याचे 5 ते 6 लाखचे आर्थिक नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केंद्रा बुद्रुक येथील अकील शहा नूर शहा यांनी विठ्ठल रखुमाई देवस्थानची शेत जमीन मक्तेदारीवर केली होती मात्र अज्ञाताने दिनांक 9 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सोयाबीनच्या दोन्ही गंजी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी महसूलचे तलाठी देशमुख यांनी पंचनामा केला.