1 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता च्या सुमारास पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हेगार शाखा युनिट एकच्या पथकाने अत्यंत धाडसी कार्यवाही करून नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घरफोडीचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील आरोपींमध्ये रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुडे यांचा समावेश आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.