मुरुड: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुरूड येथे मुस्लिम समाजातील बांधवांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
Murud, Raigad | Oct 24, 2025 आज शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुरूड येथे मुस्लिम समाजातील बांधवांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध पक्ष संघटनात्मक व विकासकामांसह महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वसमावेशक राजकीय व सामाजिक भूमिकेतून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या ध्येय-धोरणांबाबत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.