थेऊर येथे अनाधिकृत प्लॉटींगमुळे शेतकरी अडचणी आल्याचे दिसून येत आहे.स्थानिक शेतकरी अथर्व कुंजीर यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. अनधिकृत केलेल्या प्लॉटिंग धारकांनी नैसर्गिक ओढ्याच्या स्त्रोतांमध्ये सिमेंटचे मोठे पाईप टाकून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केला आहे. यामुळे पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचले आहे. असा आरोप स्थानिक शेतकरी अथर्व कुंजीर यांनी केला आहे.