जळगाव: भोकर येथील राहत्या घरात शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या, कारण अस्पष्ट; जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव तालुक्यातील भोकर गावात राहणारे ४५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावर दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्माराम प्रल्हाद सपकाळे वय-४५ रा. भोकर ता. जळगाव असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.