पाचोरा: दत्त जयंतीनिमित्त पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या हस्ते पूजा-अर्चना, महाप्रसादाचाही लाभ,
दत्त जयंतीनिमित्त पाचोरा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या हस्ते पूजा-अर्चना करून भक्तिमय वातावरणात श्री दत्त आरतीचा भक्तीमय सोहळा आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी पार पडला. यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते, सायंकाळी 7 वाजता पोलीस स्टेशन प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी वारकरी शिक्षण संस्थेतील बालगोपाल, पत्रकार बांधव, पोलीस स्टॉप मोठ्या संख्येने उपस्थित होता होता.