जालना: आ अर्जुनराव खोतकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन**शेतकऱ्यांनी तत्काळ आवश्यक कागदपत्रे अपलोड करून योजनांचा लाभ घ्यावा !*
Jalna, Jalna | Oct 15, 2025 आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांअंतर्गत एकूण 32,828 शेतकऱ्यांची ऑनलाइन निवड झालेली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची अपलोड प्रक्रिया सुरू असून, निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित कागदपत्रे सादर करावीत, असे मा. आमदार श्री. अर्जुनराव खोतकर यांनी आवाहन केले आहे