अत्यंत ज्वलनशील असणारा सोयाबीन तेल वाहून नेणाऱ्या टँकरने अचानक पेट घेतला, मात्र अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. सदर घटना दि. १९ नोव्हेंबर ला सकाळी ११. ०० वाजते दरम्यान भद्रावती शहरातील तहसील कार्यालय परिसरात चंद्रपूर-नागपूर रोडवर घडली. या अपघातात टँकर क्र. एम एच ३४ एम १७९५ चे नुकसान वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नाही.