नाशिक: स्वरतीर्थचे पहिले सत्र संगीतमय वातावरणात रंगले
Nashik, Nashik | Nov 7, 2025 महाकवी कालिदास कलामंदिर येथे दसककर संगीत साधक परिवारातर्फे आयोजित ‘स्वरतीर्थ’ या संगीत महोत्सवाचे पहिले सत्र शुक्रवार (दि. 7 नोव्हेंबर) रोजी दिमाखात पार पडले. पारंपरिक आणि आधुनिक संगीताच्या संगमाने सजलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात दसककर भगिनी अश्विनी, कल्याणी, ईश्वरी, गौरी, सुरश्री तसेच विद्यार्थ्यांच्या सुरेल नांदीने झाली. यावेळी रसिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.