जालना: जालन्यात भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू.
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; परिसरात खळबळ...
Jalna, Jalna | Apr 25, 2026 जालन्यात भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू. भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; परिसरात खळबळ... देवमूर्ती गावावर शोककळा, पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू.. आज दिनांक 25 शनिवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील गोंदेगाव फाट्यावर एक भीषण अपघात घडला असून या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.