तुमसर: रोंघा जंगलात वाघाची दहशत, दोन गाईं ठार केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
तुमसर तालुक्यातील रोंघा लेंडेझरी परिसरात शनिवारी सायं. वाघाने गायींच्या कळपावर हल्ला करून पशुपालक धनराज सोनवाने यांच्या दोन गायी ठार केल्या. तर भर दिवसा नागरिकांना वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य व त्यांची चमू वाघाचा शोध घेत असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आज दि. 20 जानेवारी रोज मंगळवारला दुपारी 4 वा. वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य यांनी केले आहे