अकोला: इलेक्ट्रॉनिक जाहिरातींसाठी प्रमाणन अनिवार्य — उमेदवारांनी पाळावा नियम
Akola, Akola | Nov 10, 2025 अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन घेणे आवश्यक आहे. दूरदर्शन, केबल वाहिन्या, यूट्यूब, एफएम, संकेतस्थळे, एसएमएस, चित्रपटगृह आदी माध्यमांवरील जाहिरातींसाठी ही अट लागू आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जाहिरातीच्या प्रसारणापूर्वी किमान पाच दिवस आधी अर्जासह इलेक्ट्रॉनिक प्रत आणि संहितेच्या प्रती जोडणे बंधनकारक