सावनेर येथे आज १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या. दुपारी १२.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. मात्र या संवादात एका तक्रारीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले