कळमनूरी: तोंडापूर फाटा शिवारात स्कूटीच्या धडकेत युवक ठार, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात स्कूटी चालकावर गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील आ.बाळापुर ते वारंगा फाटा रस्त्यावर तोंडापूर फाट्याजवळ स्कुटी क्रमांक एम एच 38 यू 7745 च्या चालकांने आपले वाहन वेगात चालवून तोंडापूर येथील किरण शिखरे वय 20 वर्षे हा आपल्या काका सोबत 12 ऑक्टोबर रोजी सायं तोंडापूर कडून वारंगा फाटा कडे पायी जात असताना त्यास जोराची धडक दिली आहे .यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे .या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने स्कुटी चालकावर आ .बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी प्राप्त झाली आहे .