पातुर: पातूर शहरात भीषण राडा! चार जण गंभीर जखमी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल पोलिसांचा तपास सुरू
Patur, Akola | Sep 23, 2025 पातूर शहरात भीषण राडा झाला. पातूर शहरात अवैध जुगार अड्ड्याच्या पैशाच्या कारणावरून मोठा राडा झाला आहे. पातूर शहरातील बादशाह चौकात रात्री नऊच्या सुमारास मटका लागल्याच्या कारणावरून पैसे न दिल्याने दोन गटात वाद झाला आणि त्यानं भीषण रूप घेतलं. या हाणामारीत चाकू आणि पाईपचा वापर झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सैय्यद आसिफ सैय्यद अनिस, आझम अली आणि शेख आवेज शेख बिस्मिल्लाह यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.