पनवेल: महिलांना स्वसंरक्षणाचे धडे; महिलांसाठी प्राचीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप
Panvel, Raigad | Mar 16, 2026 "प्रशिक्षण हे केवळ शस्त्र चालवण्याचे नसून, ते स्वतःबद्दलचा स्वाभिमान जागृत करण्याचे एक संकल्प शिबीर होते आणि हा संकल्प १०० टक्के यशस्वी झाला आहे. समाजात स्वाभिमानाने वावरण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक शाळेत महिला भगिनींना मिळायला हवे," असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्ष तथा नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या पुढाकारातून आयोजित 'प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराच्या' सांगता समारंभात ते बोलत होते.