अकोट: शिवसेनेतर्फे प्रभाग ७ मध्ये 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' केवायसी शिबिर पार पडले
Akot, Akola | Oct 19, 2025 शिवसेनेतर्फे प्रभाग ७ हनुमान नगर मध्ये 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' केवायसी शिबिर पार पडले शिबिरादरम्यान एकूण ४५ लाडक्या बहीणींनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली. या योजनेअंतर्गत ई-KYC झालेल्या लाभार्थी महिलांना ₹1,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष (उर्फ अभिजित) रामाभाऊ कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शिबिरात लाभार्थींना महिलांचे आधार कार्ड,पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड व आधार-लिंक मोबाईल क्रमांक यांच्या आधारे ई-KYC करण्यात आली.