चंद्रपूर: मनपा तर्फे दिव्यांग कल्याण धोरण अंतर्गत 34 दिव्यांग लाभार्थ्यांना
देण्यात आले 23.82 लक्ष रुपयांचे अनुदान
दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याण धोरणाची अंमलबजावणी केल्या जात असुन याअंतर्गत 34 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण 23.82 लक्ष रुपयांचे अनुदान आज दि 19 सप्टेंबर 12 वाजेपर्यंत देण्यात आले आहे.