जालना: शहरात पोलीस अधीक्षक कार्यालयासह परिसरात बरसला वादळीवाऱ्यासह पाऊस
Jalna, Jalna | Jun 22, 2026 आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जालना शहर जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे या आलेल्या पावसामुळे मागील किती महिन्यापासून उन्हाचा तडाका सहन करणाऱ्या जालना शहरवासीयांना वातावरणात थंडावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले, मात्र त्या पावसाने जरी थंडावा निर्माण झाला असला तरी बळीराजा मात्र अद्याप खरीप पेरणी करण्यासाठी पुढे सरसावला नाही कारण पेरणी करण्यासाठी बळीराजाला मोठ्या पाण्याची प्रतीक्षा असल्याचे पाहायला मिळत आहे.