नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शुक्रवारी भाजप आणि काँग्रेसच्या बंडखोरांसह एकूण ३०२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून प्रत्यक्ष प्रचाराचा धुरळा उडणार आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत पहिल्या दिवशी केवळ १२ उमेदवारांनी माघार घेतली होती.