जालना: बदनापूर येथे 33 लाख 50 हजार 510 रुपयाचा गुटखा जप्त; चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई
Jalna, Jalna | May 21, 2026 महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास घातक गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणार्या बोलेरो पिकअप वाहनावर चंदनझिरा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 33 लाख 50 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवार दि. 21 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाटा परिसरात करण्यात आली. बर्हाणपूर (मध्यप्रदेश) येथून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किंगाव फाटा परिसरात अवैध विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात होता.