समुद्रपूर: कंटेनरची दुचाकीला मागून धडक: कंटेनरच्या चाकाखाली घेऊन दुचाकीस्वार ठार:कांढळी चौकातील घटना
समुद्रपुर:तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कांढळी चौकात दुचाकीस्वाराला कंटेनरने मागून जबर धडक दिली यावेळी दुचाकीस्वार रस्त्यावर पडुन त्याच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. प्राप्त माहितीनुसार नागपूर बेसा येथिल रहिवासी अभय प्रभाकर किनकर हा चंद्रपूर येथील पावर हॉऊस येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असल्याने तो नागपूर वरून चंद्रपूर येथे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ४० बि. एच ४९७५ ने कामावर जात होता.