बार्शीटाकळी: 50 टक्के जळालेल्या रूपाली खंडारे या महिलेसाठी चक्क उपमुख्यमंत्र्यांचा शिंदे सेनेच्या संपर्कप्रमुखांना फोन.
देवी खदानी जवळ राहणाऱ्या रूपाली खंडारे नामक महिला ही २दिवसापूर्वी सकाळी आपले दैनंदिन काम करत असताना घराच्या समोर दारात जमलेला कचरा झाडूच्या साह्याने गोळा करून तो पेटवला दरम्यान याच वेळी जळालेला कचरा अंगात परिधान केलेल्या वस्त्राला पेट घेतला यामध्ये ती 50% जळाली दरम्यान उपस्थित पती खंडारे यांनी स्वतः रूपालीला अकोल्याच्या रुग्णालयात भरती केले. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेचे विदर्भ प्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना फोन करून तत्काळ याबाबत माहिती घ्या आदेश दिले