वडवणी न्यायालयासमोरील अतिक्रमण मंगळवार दि.23 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हटविण्यात आले आहे.नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.कारवाई दरम्यान अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला.न्यायालय परिसरात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.सार्वजनिक रस्ता मोकळा व्हावा व नागरिकांची गैरसोय टळावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.