खामगाव: खामगांव येथील गुरांच्या बाजारातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास
खामगांव येथील गुरांच्या बाजारातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. कारजा रमजानपूर ता. बाळापूर येथील दत्तप्रभू वासुदेव तायडे (३३) हे खामगाव येथील गुरांच्या बाजारात म्हैस घेण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एमएच ३० BF ११२८ ही गुरांच्या बाजाराच्या गेटसमोर लावली होती. कुणीतरी अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास केली. या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल.