नागपूर ग्रामीण: 'आय लव यू हजबंड जी ' म्हणत हृदयस्पर्शी सुसाईड नोट लिहून महादुला येथे विवाहितेची माहेरी आत्महत्या
सततचा कौटुंबिक कलह आणि पतीकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक याला कंटाळून ३४ वर्षीय मयुरी संदीप मेंढे यांनी महादुला येथील आपल्या माहेरी गळफास लावून रात्री आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत.मयुरी यांनी चिठ्ठीत लिहिले की, "मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुमच्याशिवाय राहू शकत नाही. पण वारंवार समजावून सांगूनही तुम्ही मला समजून घेत नाही आणि प्रतिसादही देत नाही.