तालुक्यातील पांढरीचा पूल-मिरी रस्त्यावर सोमवारी (ता. ५) रात्री पेट्रोलिंगदरम्यान पाथर्डी पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअपमधून नेला जात असलेला सुमारे ६८ किलो गांजा हस्तगत केला. संत्रा मोसंबीच्या कॅरेटमध्ये लपवलेला गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.मिरीतून सात गोण्या गांजा हस्तगत;