परभणी: परभणीच्या तहसीलदारांना गोरगरीब जनतेला मदत करण्याच्या आ.गुट्टे यांनी दिल्या सूचना
आ. रत्नाकर गुट्टे यांनी तत्काळ परभणीचे तहसीलदार राजापुरे साहेब यांना संपर्क साधून गोरगरीब जनतेला मदत करण्याच्या सूचना दिल्या. अतिवृष्टीमुळे नदी,नाल्यांना आलेल्या पुरामुळे परभणी शहरातील वार्ड क्रमांक 12 व 16 येथील नागरिकांच्या घरात प्रचंड पाणी शिरले होते. आज परभणी शहरातील वार्ड क्रमांक 16 व 12 विविध भागातील नागरिकांच्या घरांच्या पडझडीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर नागरिकांशी संवाद साधत धीर दिला.