चांदूर बाजार: काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत निघालेल्या अन्न शुद्धी पदयात्रेचे, मोर्शी शहरात आगमन
नैसर्गिकशेतीचे महत्व संपूर्ण देशाला समजावून सांगून शुद्ध आहाराबाबत जनजागृती करण्याकरिता काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गौरवजी त्यागी यांचे नेतृत्वात पदयात्रा काढण्यातआलीआहे. आज दिनांक 29 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकात या पदयात्रेचे आगमन झाले.जिल्ह्यातील चांदूरबाजार अचलपूर व अनेक ठिकाणी प्रवास करून दोनहजार किलोमीटरचे लक्ष पूर्ण करून मोर्शी येथे दाखल झालेल्या पदयात्रेचे मनीष चौधरी सुहास ठाकरे व कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन पदयात्रेचे स्वागत केले