जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या विवाहितेला रिक्षा घेण्यासाठी ५० हजारांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासरी पाळधी येथील पतीसह सासरकडील मंडळींविरोधात मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.