गेवराई: घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने खांडवी येथून मुसक्या आवळल्या
Georai, Beed | Oct 12, 2025 आपल्या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात जाऊन दिवसभर रेकी केली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दारू ढोसून त्याच नशेत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून घरफोडी केली. ऑगस्ट महिन्यात घडलेल्या या घटनेतील दारुड्या चोरट्याला शनिवारी बेड्या ठोकल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. बालाजी उर्फ बोराड्या फार्म भोसले (वय २५, रा. खांडवी शिवार, ता. गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. १८ ऑगस्ट रोजी त्याने दिवसभर रेकी करून पाचेगाव येथील एका व्यक्तीच्या घरी प्रवेश केला