चंद्रपूर: खा.प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीने महाकाली मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांच्या मनपा सभागृहात समस्या मार्गी
महाकाली मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज दि. 15 सप्टेंबरला 2 वाजता चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील व्यापारी प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडल्या. विशेषतः महिला व्यापाऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध आव्हानांविषयी सविस्तर चर्चा केली.