पनवेल: आमदार चषक २०२५' क्रिकेट स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत दिल्या शुभेच्छा
Panvel, Raigad | Nov 11, 2025 कैलासवासी चंद्रकांत स्मृती श्री कृष्ण स्पोर्ट्स नागझरी यांच्या आयोजनातून आणि भाजपचे युवानेते महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नागझरी येथील मैदानात करण्यात आले आहे. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले तसेच खेळाडूंना प्रोत्साहित केले.