वरोरा शहरातील मालवीय वॉर्ड, प्रभाग क्र. 01,रेल्वे स्टेशन चौक येथून श्री जग्गनाथ बाबा मंदिर, भांदेवाडा करिता आज दि 16 नोव्हेंबर ला 12 वाजता बस सुरु करण्यात आलेली आहे. त्या निमित्ताने दर महिन्याच्या 16 तारखेला सदर कार्यक्रम घेण्यात येते. सदर उपक्रमात हरीश केशवाणी,पानघाटे भाऊ, शेख जब्बार, एसटी आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर डेपो मॅनेजर, सूरज केशवाणी, ओम यादव, प्रशांत केशवाणी व इतर मान्यवर उपस्थित होते.