सोनपेठ: पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 70 हजार नुकसान भरपाई द्या किसान सभाचा सोनपेठ तहसील कार्यालयावर जणआक्रोश मोर्चा
सततच्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतातील उभे पिक, फळबागा उध्वस्त झाल्या आहेत तसेच पशुपालकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे, शहरी व ग्रामीण भागात नागरिकांच्या घरांचे व संसारउपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार नुकसान भरपाई द्यावी, शेतकरी शेतमजूर, बटाईदार शेतकरी यांचे सर्व प्रकारचे बँक कर्ज, मायक्रो फायनान्स, खाजगी सावकारी कर्ज संपूर्ण माफ करावे यासह अन्य मागण्यासाठी किसान सभाचा सोनपेठ तहसीलवर जणआक्रोश मोर्चा.