अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सीसीटीव्ही, त्रिनेत्र व रक्षा प्रकल्पाचा पालकमंत्री फुंडकर यांच्या हस्ते शुभारंभ
Akola, Akola | Sep 17, 2025 अकोला जिल्हा पोलीस दलाचे कमांड अँड कंट्रोल कक्ष, त्रिनेत्र व रक्षा प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरतील, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. त्यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिनांक 17 सप्टेंबर रोजी।दुपारी 2 वाजता झाला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक सी.के. रेड्डी आदी उपस्थित होते. रक्षा प्रकल्पाद्वारे नागरिकांना पोलिसांच्या कामकाजाबाबत तक्रारी नोंदविता येतील. त्रिनेत्र प्रकल्पामुळे